Thursday, August 30, 2007

आठवण...!



हसता हसता डॊळे अलगद येतीलही भरून
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरून
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही

रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
सृष्टीमध्ये दॊनच जीव ... आणखी कुणी नसॆल
भिरभिरल्यागत होण्यासारखंल बिलकु काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही

मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारख वाटेल
जुनाच काढुन एसएमएस वाचावासा वाटेल
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकु काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही

जेवता जेवता जीवघेणा लागॆल ही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डॊळे पुसत, पाणी प्यावे थॊडॆ
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडॆ
सांगुन ध्यावं काळजीसारखं बिलकु काही नाही

"कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही

No comments: