
मी कुठे कविता करतो
मी फक्त शब्दांशी खेळतो
भावनांना कुरवाळून मी
स्वप्न उधळतो
मी कुठे कविता करतो
वेदना शब्द बनून वाहतात
भळभळत्या त्या जख्मां पुन्हा
ताज्या बनू पाहतात
कविता आणि मी, छे छे
मी दु:खांचा लिलाव करतो
मग एखादा सुखी ग्राहक
माझ्याकडे अश्रूंचाही भाव करतो
खरं तर,
घेणया पेक्षा माझे
देण्याचे विचार शुद्ध आहेत
पण, मी काय करावं, जर
घेणारेच माझ्या विरुद्ध आहेत

No comments:
Post a Comment